ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी बसून मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल काय काय सांगायचे, हे ऐकलं तर उद्धव आणि रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार
नारायण राणे पुढे म्हणाले की, एक गोष्ट आज मी सर्वांना सांगतो , एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना नक्की भेटणार. कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल काय काय सांगायचे, हे मी उद्धव ठाकरेंना सांगणार. मी राऊतांनी सांगितलेली माहिती ठाकरेंना दिल्यावर ते राऊतांना चपलेने मारतील, असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: राणेंचे राऊतांना प्रतिआव्हान; म्हणाले, ‘तू जिथे म्हणशील तिथे येतो, बघूया’… )
राऊत मातोश्रीला लागलेला सुरुंग
राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. ही व्यक्ती मातोश्रीला लागलेला सुरुंग आहे. ही व्यक्ती ज्याच्या खांद्यावर हात ठेवते, तो खांदा गळलाच म्हणून समजा. हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारु नका, असे म्हणत राणे यांनी संताप व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community