गुजरातमधील राजकोट येथे बांधण्यात येत असलेल्या एका छोट्या धरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. हा बंधारा ‘गिर गंगा’ परिवार ट्रस्ट तर्फे उभारण्यात येत आहे. राजकोट- कलावाड मार्गावरील वागुदाद गावाजवळील न्यारी नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून, यासाठी 15 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
बुधवारी स्थानिक आमदार दर्शिता शाह आणि राजकोटचे महापौर प्रदीप देव यांच्या उपस्थितीत या बंधा-याचे भूमीपूजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला आदरांजली म्हणून या बंधा-याचे नामकरण ‘हिराबा स्मृती सरोवर’ असे करण्यात आले आहे. यामुळे इतर लोकांनाही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दान करण्यासाठी प्रेरणा मिळेल, हा यामागचा हेतू होता, अशी माहिती गिर गंगा परिवार ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप सखिया यांना दिली.
( हेही वाचा: सूर्यावर मोठा स्फोट; पृथ्वीला ताप? )
पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे 30 डिसेंबर रोजी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. अहमदाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हिराबोन मोदी यांच्या स्मरणार्थ राजकोट येथील बंधा-याला हिराबा स्मृती सरोवर नाव देण्याचा निर्णय गिर गंगा परिवार ट्रस्टने घेतला.
Join Our WhatsApp Community