स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी शनिवार, ७ जानेवारी रोजी अमरावती येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक येथील भगूरपर्यंत जाणार आहे.
भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचारप्रसार करण्यासाठी अमरावती ते स्वातंत्रवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगुरपर्यंत भाजपाचे माजी नगरसेवक अजय पाटील यांनी या बाईक रॅलीचे आयोजन केले. ही बाईक रॅली काही वेळापूर्वी अमरावती येथील राजकमल चौकातून पुढे गेली. यावेळी भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा देशात ‘लव्ह जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; देशपातळीवर धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज)
सावरकर स्वतंत्रसूर्य होते – खासदार अनिल बोंडे
स्वातंत्रवीर सावरकर हे फक्त स्वातंत्रवीर नव्हते तर ते स्वातंत्र्यसूर्य होते. त्यांच्यावर बथड डोक्याचा राहुल गांधी जर थुंकत असतील, तर ती थुंकी बथड डोक्याच्या राहुल गांधींवर पडेल आणि त्यांच्या काँग्रेसवर पडेल. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर १३५ भारतीयांच्या मनामनामध्ये आहेत, अशी टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
Join Our WhatsApp Community