भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेदरम्यान, भारताचा गोलंदाज अर्शदीपने दोन षटकांत 5 नो बाॅल टाकत सर्वाधिक नो बाॅल टाकण्याचा लज्जास्पद रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. त्यामुळे चांगल्या विक्रमांसोबत, क्रिकेटमध्ये काही नकोसे विक्रमदेखील होत असतात, जे कोणालाही चुकलेले नाहीत. भारतीय खेळाडूंनीही असे अनेक नकोसे विक्रम आपल्या नावे केले आहेत. या खराब विक्रमांबद्दल जाणून घेऊया.
सुनिल गावस्कर – सर्वात संथ खेळी
केवळ भारतातच नव्हे तर जगातील महान फलंदाजांपैकी एक सुनिल गावस्कर यांच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात संथ खेळी खेळल्याचा विक्रम आहे. त्यांनी 1975 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 174 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या होत्या.
( हेही वाचा: सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘इथे’ खेळणार शेवटचा सामना )
अजित आगरकर – सलग 7 डावांत शून्यावर बाद
अजित आगरकर एक वेगवान गोलंदाज म्हणून संघात आला होता. पण त्याला फलंदाजीही चांगली माहिती होती. कसोटी क्रिकेटच्या सात डावांमध्ये सलग शून्य धावा करण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यावेळी त्याने सलग 7 डावांमध्ये खाते न उघडू शकल्याने आगरकरवरही खूप टीका झाली होती.
युवराज सिंह – एका षटकात सर्वाधिक धावा देणे
युवराज सिंहचे 6 चेंडूंवरील 6 षटकात हा विक्रम सर्वांना माहिती आहे. पण या विक्रमाआधीचा हा किस्सा आहे. इंग्लिश फलंदाज दिमित्री मास्करेन्हासने युवराजला ओव्हलवर डावाच्या पन्नासाव्या षटकात 5 षटकार ठोकले होते. दिमित्री मास्करेन्हासने युवीच्या एकाच षटकात 30 धावा केल्या होत्या. यासह युवराज सिंहच्या नावावर भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा खर्च करण्याचा लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला होता.
कर्णधार म्हणून टी-20 मध्ये शून्यावर बाद झालेले भारतीय खेळाडू
- विराट कोहली – 3 वेळा बाद
- शिखर धवन – 1 वेळ
- रोहित शर्मा- 1 वेळ