चाळीसगाव येथील ‘रंगगंध कलासक्त न्यास’तर्फे गेली २१ वर्षे घेण्यात येत असलेली ‘पुरुषोत्तम दारव्हेकर अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा’ मुंबई केंद्रावर व्हिजन व्हॉईस एन अॅक्टच्या वतीने येत्या ५ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. नेहरू नगर कुर्ला येथील प्रबोधन प्रयोग घराच्या रंगमंचावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये कथा, कविता, आत्मवृत्त, वैचारीक लेख किंवा संमिश्र इत्यादी कोणत्याही साहित्य प्रकाराचे वाचन करता येईल. वाचन संहिता सलग नाट्यात्मक अनुभूती देणारी असावी. नाटक वा एकांकीकेचे वाचन या स्पर्धेमध्ये करता येणार नाही. कवितादेखील निवेदनाद्वारे संहितेच्या स्वरुपात बांधलेल्या असाव्यात. निव्वळ कवितांचे वाचन स्पर्धेमध्ये गृहीत धरले जाणार नाही.
सर्वोच्च महत्व वाचिक अभिनयाला
५ फेब्रुवारी रोजी पूर्वप्राथमिक व प्राथमिक अशा दोन फेर्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी निवडलेल्या संहितेतील ‘सर्वोत्तम १० मिनिटे’ वाचनाविष्कार पूर्वप्राथमिक फेरीमध्ये सादर करावयाच्या आहेत. त्यातून ६ संघांची निवड प्राथमिक फेरीसाठी करण्यात येईल. प्राथमिक फेरीतील सादरीकरणाचा कालावधी २५ ते ३० मिनिटे असावा. प्राथमिक फेरीमधून विजयी होणार्या प्रथम दोन संघांना अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळेल. स्पर्धक कलाकारांची संख्या किमान दोन व कमाल पाच असावी. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च महत्व वाचिक अभिनयाला दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा,