महानगरपालिकेच्या रुग्णवाहिनी गॅरेजमधील ३३ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

129

मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभाग अंतर्गत चिंचपोकळीतील रुग्णवाहिनी यानगृहाच्यावतीने (ऍम्ब्युलन्स गॅरेज) शनिवारी, ७ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ३३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

blood 1 blood1

रुग्णवाहिनी यानगृह कामगार समितीच्या वतीने, मुंबई सेंट्रल येथील बाई य.ल. नायर धर्मादाय महानगरपालिका रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या हस्ते या शिबिराचा प्रारंभ करण्यत आला. याप्रसंगी उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) भागवतकर, सहायक अभियंता म्हात्रे, कनिष्ठ अभियंता मनोज कोल्हे, सूरज पवार, तांत्रिक समयपाल भरत पाताडे, वाहनचालक सर्वश्री हिरासिंग राठोड, प्रकाश जेधे, एकनाथ शिर्के, गोविंद राणे, धनंजय सोरटे, तुकाराम वळुंज, नितीन यादव, दीपेश झोरे, मधुकर कांबळे, शीलकुमार कांबळे यांच्यासह यानगृहातील कामगारही याप्रसंगी उपस्थित होते. नायर रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने रक्त संक्रमण अधिकारी डॉ. उमा, समुदाय विकास अधिकारी रविशंकर ठोके यांनी रक्तदान शिबिराचे संयोजन केले.

मुंबई महानगरातील रुग्णालयांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध असावा, त्यासाठी रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या यानगृहातील कामगार-कर्मचाऱ्यांनी या शिबिराचे आयोजित केले होते. दरवर्षी नियमितपणे अशा प्रकारचे शिबिर यानगृहात आयेाजित केले जाते. या शिबिरात ३३ कर्मचाऱ्यांनी भाग घेत रक्तदान केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.