पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या साडेतीनशे एकर परस्पर विकलेल्या जमिनी पुन्हा ताब्यात घेणार असा सचिव शिवराज नाईकवाडी यांनी दावा केला आहे. विशेषत: ज्योतिबा शासनकाठीच्या व्यवस्थेसाठी आणि वर्षभराच्या दिवा पाण्यासाठी पश्चिम देवस्थान समितीने 45 हून अधिक गावांमध्ये जमिनी दिल्या होत्या. मात्र त्या जमिनी परस्पर विकल्याचे निदर्शनास आले आहे.
15 जानेवारी अखेर छाननी करण्याचे काम
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कायद्यानुसार या जमिनी कोणाला विकता येत नाहीत, याची छाननी करण्याचे काम चालू असून 15 जानेवारी अखेर याची सर्व माहिती घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आपल्या ताब्यात घेणार आहे. त्यापूर्वी ज्या हेतूसाठी जमिनी दिलेल्या आहेत त्या शासनकाठी आणि दिवा पाणी यासाठीच त्याचा वापर होईल, अशीही माहिती शिवराज गायकवाड यांनी दिली. या संदर्भात आपल्या गाव परिसरात ज्योतिबा देवस्थान किंवा अन्य देवस्थानची जमीन असेल, तर ती थेट पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला कळवण्याचे सहकार्य करावे, जेणे करून याचा गैरवापर होणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.
Join Our WhatsApp Community