भारतीय संघाचा श्रीलंकेवर मोठा विजय! सूर्यकुमारचे शतक आणि टीम इंडियाचे रेकॉर्ड्स…

148

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत नववर्षाची विजयी सुरूवात केली आहे. तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९१ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने ही सीरिज २-१ अशी जिंकली आहे. या अखेरच्या टी २० सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक केले. दोन्ही संघांमध्ये आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून त्यातील पहिला सामना हा १० जानेवारी रोजी होणार आहे.

( हेही वाचा : धुळ्यात भीषण अपघात! केमिकल टॅंकरने अनेक वाहनांना उडवले)

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने झळकावलेल्या नाबाद शतकाने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने ५१ चेंडूंत सात चौकार आणि नऊ षटकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी केली.

भारतीय संघाचे रेकॉर्ड्स

भारताने सलग पाचव्यांदा श्रीलंकेला आपल्या भूमीवर टी२० मालिकेत हरवले आहे. श्रीलंकेची टीम अजूनपर्यंत टीम इंडियाला भारतात हरवू शकलेली नाही.

टी इंडियाने २०१९ पासून मायदेशात टी २० मालिका गमावलेली नाही. हा रेकॉर्ड भारताने कायम ठेवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टी २० मध्ये चौथ्यांदा एका डावामध्ये २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादवने टी२० मध्ये तिसरे शतक केले आहे. रोहित शर्माच्या नावावर टी२० मध्ये ४ शतके केल्याचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा सूर्यकुमार हा दुसरा भारतीय खेळाडू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.