राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल

152

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या हरियाणातून जात आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली हा प्रवास काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरेल असे काँग्रेसला वाटत आहे. राहुल गांधी सध्या उत्तर भारतात आहेत, मात्र ते कडाक्याच्या थंडीत टी शर्ट घालून फिरत आहेत, आता त्यावर भाजपच्या नेत्यांचे ट्विट सध्या जोरदार चर्चेत आले आहे. हे ट्विट राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ची पोलखोल करणारे आहेत.

राहुल गांधी टी शर्टचे मानेकडील बटणही का लावतात?

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे आणि ती उत्तर भारतातील राज्यांत आहे. तिथे सध्या कडाक्याची थंडी आहे. तरीही राहुल गांधी यांचा टी शर्ट हा पोशाख बदलला नाही. ते उबदार कपडे अजिबात घालत नाहीत, असा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत, तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमनेही राहुल गांधी यांचे कडाक्याच्या थंडीत टी शर्ट घालून फिरतानाचे राहुल गांधी यांचे व्हिडिओ व्हायरल केले. त्यामुळे माध्यमांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली. राहुल गांधीही आपल्याला थंडी लागत नसल्याचे म्हणत होते. मात्र आता भाजपच्या नेत्यांचे ट्विट राहुल गांधी यांच्या टी शर्टची पोलखोल करत आहे. यात राहुल गांधी यांनी टी शर्टच्या आतून पातळ उबदार कपडे घातल्याचे दिसत आहे ज्याला इनर विअर म्हणतात. उत्तर भारतातील नागरिक थंडीत सर्रास हे कपडे घालतात, मात्र राहुल गांधी हे टी शर्टचे मानेकडील बटणही लावून ते शिताफीने लपवतात, असे या फोटोतून अभिप्रेत होत आहे. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल होऊ लागले आहे.

(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत लिहिले, “मांजर पिशवीतून बाहेर आली आहे! स्लीव्हलेस थर्मल आणि बटणे असलेला टी-शर्ट खोटे बोलणार्‍यांची खोटी कथा उघड करतो @RahulGandhi… हिवाळ्यात थंडी वाजणे सामान्य आहे! खोट्या प्रचारासाठी लक्ष वेधण्यासाठी ही एक नौटंकी नसून दुसरे काही नव्हते.

त्याचवेळी भाजप नेते कुलजीत सिंह चहल यांनीही राहुल गांधींचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली. त्यांनी ट्विट केले, “थर्मलचे चित्र आधी आणि नंतर.”

हिमांशू जैन नावाच्या वापरकर्त्याने त्याच्या बायोमध्ये #onlymodi असे लिहिले, त्याने ट्विटरवर लिहिले, “शेवटी कळले की त्यालाही थंडी वाजत आहे. त्याची दाढी आणि त्याच्या बटन-अप टी-शर्टखालील थर्मल्स पहा.”

(हेही वाचा कोणालाही आता इतिहासतज्ज्ञ झाल्याचे वाटते; महापुरुषांच्या अवमानावरून राज ठाकरे यांचा टोला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.