दादरमधील फेरीवाल्यांविरोधातील भाजप आंदोलनावर मनसेचा प्रश्न

138

दादरमधील फेरीवाल्यांविरोधात भाजपने पुकारलेल्या आंदोलनावर मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एलफिन्स्टनमधील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आवाज उठवल्यानंतर या परप्रांतिय फेरीवाल्यांना रोजीरोटीचा कळवळा दाखवणारेच आज दादरमधील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. आम्ही आंदोलन केले तेव्हा विरोध झाला आणि आता या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी होत आहे, यामागे नक्की उद्देश काय असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. त्यामुळे कारवाई करायचीच असेल तर स्थानिकांना परवाने देऊन बाकीच्या सर्वांना हाकलून द्या, आहे का हिंमत असा सवालच मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सरकारमधील पक्षांना केला आहे.

मनसेच्या घे भरारी अभियानाचा शुभारंभ दादर पश्चिम येथील केशवराव दाते मैदानात पार पडला. या जाहिर सभेत मनसेच्या कार्यकर्त्यांना मागदर्शन करताना परप्रांतिय मुद्दा आणि दादरच्या फेरीवाल्यांचा मुद्दा आदींचा समाचार घेतला. दादरचे फेरीवाले हा नवीन विषय नाही. ही जुनीच गोष्ट आहे. मग आजच अचानक भाजपला आंदोलन का करावेसे वाटले? फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाचा उद्देश् का? असा सवाल नितीन सरदेसाई यांनी केला आहे. एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवणारा पहिला नेता म्हणजे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष. परंतु जेव्हा आम्ही हे आंदोलन केले तेव्हा असे करून चालणार नाही. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. दादरमध्ये फेरीवाल्यांची समस्या आहे, ती दूरच व्हायला हवी. पण अचानकपणे ज्याप्रकारे ही आंदोलन होऊ लागल्याने यामध्ये काही वेगळा उद्देश तर नाही असा प्रश्न पडू लागतो. आम्ही तर म्हणतो, परप्रांतातील लोक आहेत ना, मग त्यांना आजच हाकलून लावा. आम्ही केले तर आम्हाला विरोध होतो तर मग आमची ही सूचना स्थानिक असेल तर त्याला परवाने द्या आणि इतर सर्वांना काढून टाका, आहे का हिंमत असा सवाल सरदेसाईंनी केला आहे. केंद्रात त्यांचे सरकार आहे. फेरीवाल्यांना प्रमाणपत्र देताना त्यांनी काही अधिवास प्रमाणपत्रासारखी अट काढून टाकली आणि इकडे स्थानिक वेगळा मागणी करत आहे. त्यामुळे यामध्ये कटकारस्थान आहे का असा प्रश्नही सरदेसाई यांनी उपस्थित केला.

( हेही वाचा: दादरमधील मुस्लिम फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनात भाजपमध्येच फूट )

नितीन सरदेसाई यांनी मनसेने यापूर्वी केलेल्या आंदोलनांची आठवण मनसेच्या सैनिकांना करून देत आता सर्वच पक्षांवरील लोकांचा विश्वास उडालेला आहे. लोकांचा विश्वास हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आपल्या पक्षावर आहे. त्यामुळे लोक शिवतीर्थवर येत असतात. त्यामुळे निवडणूका कधीही लागू द्या, मनसेचे नगरसेवक निवडून येतील आणि सर्व महापालिकांवर मनसेचीच सत्ता असेल असा विश्वास व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.