मागच्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए, नसीब बदले या ना बदले, वक्त जरुर बदलता है’, अशा आशयाचा हा शेर आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आज संजय राऊत यांना अपेक्षित अशा गोष्टी घडणार का, हे पाहावे लागणार आहे.
( हेही वाचा: …तर महापालिकेचे अधिकारीच येणार अडचणीत! )
Good morning..
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/C8TWz86FcW— Sanjay Raut (@rautsanjay61) January 10, 2023
सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या काळातही संजय राऊत सोशल मीडियावरुन दररोज सूचक संदेश देत होते. आता संजय राऊत यांनी ट्वीटवर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु, आता सर्वोच्च न्यायालय मंगळवारी होणा-या सुनावणीत नेमके काय निर्देश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community