टेस्लाच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे, टेस्लाचे मालक एलाॅन मस्क यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे, एलाॅन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीत विश्वविक्रम केला आहे. त्यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. एलाॅन मस्क यांची एका वर्षात 180 अब्ज डॉलर एवढी संपत्ती कमी झाली आहे. फोर्ब्स मासिकानुसार, 2021 मध्ये, एलाॅन मस्क यांची मालमत्ता $ 320 अब्ज होती. आता जानेवारी 2023 मध्ये $ 138 अब्ज इतकी कमी झाली.
22 वर्ष जुना विक्रम मोडला
एवढ्या कमी वेळेत संपत्ती गमावण्याच्या बाबतीत एलॉन मस्क यांनी 22 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. आतापर्यंत हा विक्रम जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोन यांच्या नावावर होता. मासायोशी सोन यांनी 2000 मध्ये $ 58.6 अब्ज गमावले. पण आता हा विक्रम एलॉन मस्क यांच्या नावावर झाला आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, एलाॅन मस्क यांनी $200 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या व्यक्तीने $200 अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे.
Join Our WhatsApp Community