जी-२० परिषदेनिमित्ताची पुण्यातील बैठक पुढील सोमवार आणि मंगळवारी (१६, १७ जानेवारी) होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने पुणेरी ढोल पथक, मर्दानी खेळ, लावणी, जुगलबंदी, शिववंदना, गणेशस्तुती तसेच गोंधळ आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय राखावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
( हेही वाचा : आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराच्या रकमेत वाढ : आता या शिक्षकांनाही करता येईल अर्ज)
‘जी २०’ परिषदेच्या बैठका
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुशोभीकरण आणि विकासकामांची पाहणी चंद्रकांत पाटील यांनी केली. पुणे शहरात होणाऱ्या ‘जी २०’ची तयारी जवळपास पूर्ण होत आली असून, येणाऱ्या पाहुण्यांचे पुणेकरांनी उत्साहाने स्वागत करावे. पण या काळात वाहतूक कोंडीमुळे आपली थोडीशी गैरसोय होईल, पण तो स्वागताचाच एक भाग मानावा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील केले. तसेच विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या दरम्यानची मेट्रोची कामे ११ जानेवारीपासून बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
पुण्यात १६ आणि १७ जानेवारी रोजी ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने बैठका होणार आहेत. यासाठी ३७ देशातून सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता या मार्गाची पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community