हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात दोन लाख रुग्णांनी घेतला उपचार

210

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर दवाखान्यांचा लाभ घेणा-यांच्या संख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या लाभार्थ्यांची ही संख्या मंगळवारी २ लाख ०६ हजार ४४८ इतकी झाली आहे.

( हेही वाचा : नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था; राज्य सरकारची मंजुरी)

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या कार्यवाही अंतर्गत सध्या ६६ ठिकाणी आपले दवाखाने कार्यरत आहे. ही संख्या येत्या २६ जानेवारीपर्यंत १०० इतकी वाढविण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपले दवाखाने हे प्रामुख्याने सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीदरम्यान कार्यरत आहेत.

या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरण पूरक होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.