उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादाला आता वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. हिंदी मालिका-चित्रपटसृष्टीचे लोक एका वेगळ्याच जगात जगत असतात. बर्याचदा त्यांचा आपल्या जगाशी संबंध नाहीच, असे वाटून राहते. या विश्वातील न्यूडिटी काही नवीन नाही. याआधीही असे अनेक प्रकार घडले आहेत. एकीकडे हिजाब हा अधिकार आहे, असे सेक्युलर मंडळी सांगतात, तर दुसरीकडे हिंदू धर्मातील अतिशय साध्या प्रथांवर टीका करतात आणि त्याचबरोबर उर्फीचे समर्थन देखील करतात. हा दांभिकपणा सेक्युलर मंडळींना व्यवस्थित जमतो.
उर्फी जावेदला भान नाही
अर्थात कुणीही कोणते आणि कसे कपडे घालायचे, हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नसला तरी प्रत्येकाने भान ठेवण्याची गरज आहे. व्यावसायासाठी काही गोष्टी करणे आणि त्याच गोष्टी सार्वजनिक ठिकाणी करणे यात फरक आहे. परंतु उर्फी जावेद सारख्या व्यक्तींना ते भान ठेवता येत नाही. आता तिने खरोखर सार्वजनिक ठिकाणी काय केले हे पाहावे लागणार आहे. परंतु काही गोष्टी असतात, त्याकडे दुर्लक्ष केलेले कधीही चांगले.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर उद्योगपती अदानी; चर्चेला उधाण )
उर्फीने केलेली विधाने हास्यास्पद
चित्रा वाघ या भाजपाच्या धडाडीच्या आणि आक्रमक नेत्या आहेत. त्यांनी अनेकांसाठी लढा दिला आहे, अनेक प्रकरणे योग्यरित्या हाताळली आहेत. आता बाळासाहेबांची शिवसेना-भाजपाची सत्ता देखील राज्यात आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केल्यानंतर उर्फीने केलेली विधाने हास्यास्पद आहेत. अर्थात तिच्या बौद्धिक क्षमतेला झेपतील अशीच विधाने उर्फीने केली आहेत. “Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu” अशाप्रकारचे आणि याहीपेक्षा हास्यास्पद ट्विट केले आहे.
वाद टाळलेले बरे
जर चित्रा वाघ यावर देखील व्यक्त झाल्या तर उर्फी यापेक्षाही खालची पातळी गाठू शकते. कारण उर्फीसारख्या मुलीची मनःस्थिती वेगळी आहे. ती मुस्लिम समाजातली आहे. त्या समाजातील लोकांचं देखील तिने ऐकलं नसावं. त्यामुळे इतर कोणत्याही व्यक्तीने तिच्याविरोधात तिच्या पेहरावावरुन आणि राहणीमानावरुन वक्तव्य केलं तर ती अशाचप्रकारे व्यक्त होऊ शकते. म्हणूनच काही वाद टाळलेले बरे असतात. उर्फीवर चर्चा करण्यापेक्षा किंवा तिच्याशी वाद घालण्यापेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं.
Join Our WhatsApp Community