विजेच्या धक्क्याने हात गमावलेल्या कोल्हापुरातील तरुणाने परळ येथील केईएम रुग्णालयात धाव घेतली आहे. केईएम रुग्णालयात खासगी रुग्णालयांच्या तुलनेत हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च कमी आहे. खासगी रुग्णालयांत २० लाखांच्या तुलनेत केईएम रुग्णालयात ९ लाख ४४ हजारांमध्ये हाताचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. परंतु लाखापर्यंतचे खर्च परवडेनासा नसल्याने केईएम रुग्णालयाकडूनच रुग्णाने शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मागितली आहे.
२०१३ साली दोन्ही हात गमावले
कोल्हापूर येथील बैरेवाडी येथे राहणा-या श्रीसहीत परीट यांना शेतात काम करताना विजेचा धक्का लागला. या धक्क्यामुळे हाताला जखम झाल्याने परीट यांना दोन्ही हात गमवावे लागले. श्रीसहीत यांनी कृत्रिम हात लावून त्यांनी आयुष्याला नव्याने सुरुवात केली. घरात शिकवण्या घेत परीट यांनी अर्थाजनाला सुरुवात केली. ऑगस्ट २०२१ पासून केईएम रुग्णालयात हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्रक्रियेला सुरुवात केली. मध्य प्रदेशातील रुग्णाला केईएम रुग्णालयात पहिल्यांदा हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पहिल्या केसबाबत माहिती मिळाल्यानंतर अखेरिस कोल्हापुरातील श्रीसहीत परीट यांनीही हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी परीट यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. मात्र ९ लाख ४४ हजार रुपयांची आपल्याकडून तरतूद होणे शक्य नसल्याची कबुली परीट यांनी केईएम प्रशासनाला दिली. केईएम रुग्णालयाच्या समाजसेवा शाखेने स्वयंसेवी संस्थांकडे तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडेही आर्थिक मदत मागितली आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ अडीच लाख रुपयांची तरतूद झाली आहे. इतर खर्च कसा जमवायचा, हा प्रश्न अजूनही रुग्णाला सतावत आहे.
(हेही वाचा राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर उद्योगपती अदानी; चर्चेला उधाण )
Join Our WhatsApp Community