राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीकडून छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणात ईडीकडून छापेमारी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. गडहिंग्लज आणि कोल्हापूर परिसरात ईडीकडून छापेमारी सुरु आहे. सकाळी सहा वाजल्यापासून ही छापेमारी सुरु आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी बुधवारी पहाटे 6:0 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.
( हेही वाचा: आमदार बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला गंभीर मार )
Join Our WhatsApp Community