अध्यात्म हा भारताचा पाया आहे. आपल्याकडे अनेक राजे-महाराजे राज्य उपभोगून किंवा राज्यत्याग करुन तपश्चर्या करायला किंवा अध्यात्म साधण्यासाठी निघून गेले असल्याची उदाहरणे आहेत. परंतु एकाच वेळी तपस्वी आणि राजकारणी होता येत नाही. मोहनदास गांधींचा प्रवास महात्मा गांधी असा होऊ लागला तेव्हा राजकारणात वैयक्तिक उपासना आली. म्हणजे (अतिरिक्त) अहिंसा हे तत्व वैयक्तिक आयुष्यात चांगली असू शकते, परंतु राजकीय पटलावर मात्र धोकादायक सिद्ध होऊ शकते. याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागले आहेत, किंबहुना भारत आजही भोगतोय.
सध्या कॉंग्रेसचे युवराज एका वेगळ्याच मूडमध्ये आहेत. ’करुन करुन भागले नि देवपूजेला लागले’ अशी त्यांची गत झाली आहे. हिंदू धर्मावर, हिंदूंवर टीका झाल्यानंतर आता कोटाच्या बाहेर जानवे घालण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. राहुल गांधी आणि त्यांचा सबंध संघ कोणत्या जगात वावरतात याचं संशोधन झालं पाहिजे. राहुल गांधी राजकीय नेता म्हणून नापास ठरले आहेत, हे राहुल गांधींच्या सल्लागारांना कळून चुकले आहे. म्हणून त्यांनी नवीन उद्योग सुरु केले आहेत.
राहुल गांधी हे कुणी दिव्य पुरुष आहेत असं भासवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. कॉंग्रेस लोक अत्यंत ’क्यूट’ आहेत. कुणी राहुल गांधींना योगी म्हणतंय, तर कुणी तपस्वी म्हणतंय. ते इतक्या थंडीत केवळ टी-शर्टवर फिरतायत, यांचं कॉंग्रेस-जनांना भयंकर कौतुक. राहुल गांधी म्हणत आहेत की मैने राहुल गांधी को मार डाला. त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे त्यांना सांगता येत नसलं तरी जुना राहुल गांधी आता राहिला नसून हा नवा राहुल गांधी आहे असं त्यांना म्हणायचं असेल.
( हेही वाचा: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी )
राहुल गांधींच्या सल्लागारांना आता त्यांना महात्मा गांधींच्या बाजूला नेऊन बसवायचं आहे. महात्मा गांधी हे राजकीय नेते होते, त्याचबरोबर ते अध्यात्मिक पुरुष म्हणूनही नावारुपाला आले होते. एकीकडे राजकारण करताना दुसरीकडे ते भजन म्हणत होते. आता महात्मा गांधींची नक्कल राहुल गांधी करु पाहत आहेत. त्यांना असं वाटतं की हिंदू मूर्ख आहेत. त्यांना राजकीय नेता म्हणून हिंदूंनी स्वीकारलं नसलं तरी एक तपस्वी म्हणून त्यांचा स्वीकार होईल. परंतु त्यांना कोण समजावणार की तपस्वी म्हणून स्वीकारण्यायोग्य व्हायचं असेल तर तपस्वीचा अभिनय करुन चालणार नाही, तर खरोखर तपस्वी व्हावं लागेल. राहुल गांधींना राहुल गांधींना राजकीय नेता व्हायला ७ जन्म घ्यावे लागतील आणि तपस्वी व्हायला ७० जन्म! समजा तपस्वीच्या भूमिकेतही लोकांनी त्यांचा स्वीकार केला नाही तर पुढे ते कोणती भूमिका निभावतील? कदाचित ते पृथ्वीलोकावरचे नसून दुसर्याच ग्रहावरुन आल्याचे सांगू लागतील. तुम्हाला काय वाटतं?
Join Our WhatsApp Community