अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्सेसने ऑस्करसाठी पात्र असलेल्या 301 चित्रपटांची स्मरण यादी प्रसिद्ध झाली आहे. या रिमाईंडर यादीत 9 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
रिमाईंडर यादीमध्ये चित्रपटांचा समावेश आहे, जे अधिकृतपणे विवध श्रेणींमध्ये इतर चित्रपटांशी स्पर्धा करतील. तथापि, केवळ यादीत असल्याने 24 जानेवारी रोजी जाहीर होणा-या अकॅडमी अवाॅर्ड्ससाठी चित्रपट अंतिम नामांकनात प्रवेश करेल की नाही, हे तेव्हाच कळेल. पण यानिमित्ताने भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
( हेही वाचा: RRR ने रचला इतिहास; ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ )
‘हे’ नऊ चित्रपट ऑस्करच्या यादीत
- आरआरआर
- गंगूबाई काठियावाडी
- चेलो शो
- द कश्मीर फाइल्स
- मी वंसतराव
- तु्झ्यासाठी काही
- राॅकेटरी: द नंबी इफेक्ट
- कांतारा
- विक्रांत रोना