राज्यातील सत्तांतरानंतर ईडीने पहिली कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया आली आहे.
मुश्रीफ म्हणाले की, मी कामानिमित्त बाहेर आहे. दुरध्वनीवरुन मला ईडीच्या कारवाईची माहिती मिळाली आहे. कारखाना, निवासस्थान आणि नातेवाईकांची घरे तपासण्याचे काम सुरु आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी. तसेच कागल आणि कोल्हापूर बंद ठेवण्याची केलेली घोषणा मागे घ्यावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ईडीच्या कारवाया एका विशिष्ट समुदायाच्या लोकांवरच केल्या जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
( हेही वाचा: शिवसेनेचा प्रमुख नेता निवडणारे २८२ पैकी १७५ प्रतिनिधी सदस्य शिंदेंकडे; उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच )