‘ती’ गोळी सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच; अहवालातून माहिती उघड

138

गणपती विसर्जनावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटात दादर पोलीस ठाण्याच्या परिसरातच प्रंचड राडा झाला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, आपल्या बंदुकीतून गोळी सुटलीच नसल्याचा दावा सरवणकर यांनी केला होता. याप्रकरणी बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल आला असून त्यात सरवणकर यांच्याच बंदुकीतून गोळी सुटल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा: …तेव्हा क्लास चुकवून महेश कोठारेंचा चित्रपट पाहिला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला रंजक किस्सा)

पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतुसे आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की जप्त केलेली काडतूसे आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात 15 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

नेमकं घडलं काय?

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवील या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, त्यानंतर संघर्ष टळला. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या समर्थकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.