गिरगावात ठाकरे गटाच्या समर्थकांनी लावलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. तेजस उद्धव ठाकरे यांचे हे पोस्टर आहे. तेजस ठाकरे हे राजकारण लवकरच सक्रिय होणार असल्याचे या पोस्टरच्या माध्यमातून दिसून येत आहे.
तेजस ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत उतरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारण ठरतेय ते मुंबईत लागलेली पोस्टर्स. गिरगावात शिवसैनिकांनी तेजस ठाकरे यांचे पोस्टर लावले आहेत. ‘आजची शांतता.. उद्याचे वादळ…नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
( हेही वाचा: ‘ती’ गोळी सदा सरवणकरांच्या बंधूकीतूनच; अहवालातून माहिती उघड )
मविआच्या मोर्चात तेजस ठाकरे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महापुरुषांचा अपमान होईल, अशी विधाने केली जात आहेत. या विरोधात आणि निषेधार्थ महाविकास आघाडीतील सर्व पक्षीयांचा हल्लाबोल मोर्चा काढला होता. या महामोर्च्यात मविआतील अनेक दिग्गज नेते सहभागी झाले. मात्र सा-यांचे लक्ष वेधून घेतले ते उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे. तेजस ठाकरे या मोर्च्यात सहभागी झाल्याने तो सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. आता पुन्हा तेजस ठाकरे यांचे मुंबईत पोस्टर्स लागल्याने चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community