श्रीलंका आणि बांगलादेशला भारताकडून हवी आहे ‘ही’ गोष्ट

144

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कामामुळे खूप लोकप्रिय आहेत. देशात प्रदूषणाची पातळी कमी करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत आणि त्यामुळे इलेक्ट्रिक कारला अधिक प्रोत्साहन देत आहेत. आता श्रीलंका आणि बांगलादेशने भारतातून इथेनॉल आयात करण्यास स्वारस्य दाखवल्याचे, गडकरी यांनी सांगितले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले की, ‘इथेनॉलबद्दल दोन्ही देशांच्या (श्रीलंका आणि बांगलादेश) सरकारसोबत चर्चा केली आहे.’

१५ दिवसांत पेट्रोलियम मंत्र्यांसोबत होणार चर्चा

जैव इंधनावरील सीआयआय परिषदेला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, ‘मी याबाबत बांगलादेशचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या मंत्र्यांशी चर्चा केली आहे. बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी भारतातून इथेनॉल आयात करण्यास खूप उत्सुक आहेत.’ पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत १५ दिवसांत बैठक होणार आहे, ज्यामध्ये देशात इथेनॉल पंप सुरू करण्याबाबत धोरण ठरवण्याची चर्चा केली जाईल, असेही मंत्री गडकरी म्हणाले.

पुढे गडकरी म्हणाले की, ‘इथेनॉलचे भविष्य खूप चांगले आहे. देशात इथेनॉल मिसळलेले पेट्रोलची विक्री झाल्यामुळे तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. याचा सर्वात जास्त फायदा कार, बाईक अशाप्रकारची खासगी वाहने चालवणाऱ्यांना होणार आहे. तसेच प्रदूषणाच्या पातळीत घट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सरकार अधिकाधिक इथेनॉल खरेदी करण्यास उत्सुक आहे. हरित इंधनामुळे प्रदूषणाचा प्रश्नही सुटणार आहे. दरम्यान प्रदूषणाची सतत वाढणारी पातळी कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक हायवेच्या बांधकामासोबतच अधिक इलेक्ट्रिक कारवर सबसिडी दिली जात आहे.’

(हेही वाचा – भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होणार, मविआत पडणार मोठं खिंडार; बावनकुळेंचा दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.