उदगीरवरून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसमधील ४० प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे. एसटी चालकाला भर रस्त्यामध्ये अटॅक आल्यामुळे बसमधील एका तरुणाने एसटीचे स्टेरिंग सांभाळले. या बसमध्ये असणाऱ्या ४० प्रवाशांचा जीव या तरुणामुळे वाचला.
( हेही वाचा : बेस्टमधून येत्या वर्षात २०४४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार; कायमस्वरूपी भरतीची मागणी )
४० प्रवाशांचे प्राण वाचवले…
सोलापूर पुणे महामार्गावरून एसटी जात असताना अचानक एका पुलाच्या लोखंडी गार्डला बस धडकल्याचा मोठा आवाज झाला आणि सर्व प्रवासी भयभीत झाले. रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली परंतु याचवेळी एका तरुणाने धाडस करून बसच्या स्टेरिंगचा ताबा घेतला आणि हॅंडब्रेकवर बस थांबवली. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर रणे याने ४० प्रवाशांचे प्राण वाचवले.
रुग्णालयात उपचार सुरू
बस मार्गस्थ झाल्यावर रात्री चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे बस चालू असताना ते स्टेरिंवर कोसळले. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली. त्यानंतर सर्व प्रवासी आरडाओरड करू लागले पण त्याचवेळी सुधीर रणे यांनी प्रसंगावधन राखत स्टेरिंगचा ताबा घेतला आणि मोठा अपघात टळला. यामुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचले. तसेच एसटी चालक गोविंद सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community