‘उर्फीला असलेला माझा विरोध कायम राहिल. कोणी कितीही टीका केली तरी मी मागे हटणार नाही. स्वातंत्र्याच्या नावाखालचा स्वैराचार खपवून घेणार नाही,’ अशी ठाम भूमिका भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मांडली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना नंगानाच मान्य आहे का? असा चित्रा वाघ यांनी सवाल केला आहे.
दरम्यान उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील शीतयुद्ध संपण्याच नाव काही घेत नाहीये. यासंदर्भात आज उर्फीने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची भेट घेतली. त्यापूर्वी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण उर्फी संदर्भातील मत ठाम असल्याचे सांगितले.
हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही – चित्रा वाघ
चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘माझे भांडण त्या बाईशी नाही. तिच्या विकृतीशी आहे. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतेय. पुन्हा एकदा तेच सांगते, हा समाजस्वाथ्याचा विषय आहे. हा नंगानाच आम्ही चालू देणार नाही. चार भिंतीच्या आत तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. पण सार्वजनिक ठिकाणी, दिवसा रस्त्यावरती अशापद्धतीने उगडे-नागडे तुम्ही फिराल तर ते आम्हाला चालणार नाही. आम्ही ते चालू देणार आहे. हे माझे मत कायम असेल.’
‘हा समाजस्वास्थाचा विषय आहे राजकारणाचा नाही’
‘आज मुंबईच्या रस्त्यावर ती नंगानाच करतेय उद्या ती बीडच्या चौकात येऊन करेल हे तुम्हाला मान्य आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हा नंगानाच चालणार नाही. ही माझी भूमिका आहे. हा समाजस्वास्थाचा विषय आहे राजकारणाचा नाही. असे असताना मला नोटीस पाठवली. याचे मला काही दुःख नाही. मी त्या नोटीशीचे उत्तरही दिले आहे ते ही जाहीर करावे. पण उर्फीचा हा नंगानाच मान्य आहे का?,’ असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
(हेही वाचा – पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहेर; म्हणाले, राहुल गांधींना सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती!)
Join Our WhatsApp Community