शिवसेना नक्की कुणाची; १७ जानेवारीला होणार फैसला

188

राज्यातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहचला आहे. विशेष करून केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु झाल्यापासून यावर चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु झाली आहे. त्यावर शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष नक्की कुणाचा यावर निवाडा होणार आहे. आयोगासमोर शिंदे गटाने बाजू मांडली आहे, आता ठाकरे गट बाजू मांडणार आहे. त्यासाठी १७ जानेवारीला रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तर निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, यावर सुनावणी सुरु आहे. आयोगात युक्तीवाद सुरु आहे, तिथे कागदपत्रही जमा झाली आहेत. आता केवळ ठाकरे गटाचा युक्तीवाद बाकी आहे. त्यानंतर फैसला होणार आहे. मंगळवारी, १७ जानेवारीला धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय सुनावला जाईल.

(हेही वाचा नुपूर शर्मा यांना बंदूक बाळगण्याचा परवाना; दिल्ली पोलिसांची माहिती)

कोणत्या गटाने कोणती कागदपत्रे दिली? 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • 182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य
  • प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)
  • प्राथमिक सदस्य 20 लाख
  • एकूण कागदपत्र 23 लाख 182

बाळासाहेबांची शिवसेना

  • खासदार 13
  • आमदार 40
  • संघटनात्मक प्रतिनिधी 711
  • स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी 2046
  • प्राथमिक सदस्य 4,48,318
  • शिवसेना राज्यप्रमुख 11
  • एकूण 4 लाख 51 हजार 139
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.