सायंकाळी वाऱ्यांचा जोर वाढला, मुंबईत कमाल तापमान घटले

176

राज्यात उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर कोकणात तापमानात घट होत आहे. गुरुवारी रात्रीपासून उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचे वारे सक्रीय झाले. थंडीच्या वा-यांमुळे शुक्रवारी सायंकाळी बराच गारवा जाणवत होता. मुंबई महानगर प्रदेशात डहाणू येथे कमाल तापमान २४.९ अंश सेल्सिअसपर्यंत घटले. मुंबईत सांताक्रूझ तसेच ठाण्यात कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. वा-यांचा जोर पाहता उत्तर कोकणातील बहुतांश भागांतील किमान तापमानात वीकेण्डमध्ये घट दिसून येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.

( हेही वाचा : शिवसेना नक्की कुणाची; १७ जानेवारीला होणार फैसला)

मुंबईत शुक्रवारी सायंकाळी वा-यांचा जोर चांगलाच वाढल्याचा अनुभव मुंबईकरांना आला. चौपाटी तसेच संपूर्ण शहर भागांत सायंकाळी जोमाने वारे वाहत होते. वा-यांचा प्रभाव लक्षात घेता शनिवारी मुंबईतील किमान तापमानात घट होण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्यातील अधिका-यांनी व्यक्त केली. शनिवारी मुंबईतील किमान तापमान पुन्हा १६ अंश सेल्सिअसवर खाली येईल, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अधिका-यांनी व्यक्त केली. मुंबईत सध्या उत्तरेकडून वाहणा-या वा-यांचा प्रभाव वाढल्याचा अनुभव शुक्रवारी सायंकाळी ब-याच जणांना आला. एरव्हीपेक्षाही वारे जास्तच वेगाने वाहत असल्याने मुंबईकर सायंकाळी चांगलेच गारठले.

हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांच्या उत्तर कोकणातील कमाल तापमानाच्या नोंदी (अंश सेल्सिअस)

  • विरार – २६.५
  • अलिबाग – २७.३
  • तलासरी – २७.१
  • बदलापूर – २७.५
  • डोंबिवली, कल्याण – २७.७
  • नवी मुंबई , पनवेल – २८
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.