अहमदनगर: निर्मलनगर परिसरातील नागरिकांचे हाल; १५ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद

165

गेल्या १५ दिवसांपासून नगर शहरात प्रभाग दोन मधील निर्मल नगर परिसरामध्ये पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गॅस पाईप लाईन आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या सावळा गोंधळामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. पाणीटंचाईमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

गॅस पाईपलाईन आणि महापालिका अंतर्गत विषय असून अधिकाऱ्यांना या संदर्भात काही देणे घेणे नाही. तुम्ही आपापसात विषय मार्गी लावून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नगरसेवक निखिल वारे व नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम यांच्याकडे केली.

कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या मुजोरीबाबत नागरिकांनी यावेळी तक्रारी केल्या. महापालिका कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपत येत असल्यामुळे नागरिकांच्या घरी जाऊन कचऱ्याचे संकलन केले जात नाही. वारंवार ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करूनही दहा दहा दिवस घंटागाडी येत नाही. तरी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक निखिल वारे यांनी उपयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली.

(हेही वाचा – कोल्हापुर: गोकुळ-शिरगावमधील MIDCतील कंपनीला भीषण आग)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.