मुंबईत टाटा मॅरेथॉनला सुरूवात! अनेक बसमार्गात बदल

141

मुंबईतील टाटा मॅरेथॉनला सुरूवात झाली असून तब्बल दोन वर्षानंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली मॅरेथॉन ४२ किलोमीटर असणार आहे. या मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा या मॅरेथॉनमध्ये जवळपास ५५ हजार धावपटू सहभागी झाले आहे.

( हेही वाचा : एकाच तिकिटावर करा दोनदा प्रवास! भारतीय रेल्वेचा ‘ब्रेक द जर्नी’ नियम काय सांगतो?)

मुंबईत मॅरेथॉनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. जागोजागी स्वयंसेवकांकडून धावपटूंसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. टाटा समूहाने या भव्य मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलीस आणि आयोजक जागोजागी सक्रीय आहेत.

मुंबईतील बसमार्गात बदल

  • मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत त्यामुळे मुंबईतील बेस्ट बसमार्गात बदल करण्यात आले आहेत.
  • टाटा मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धकांना मार्ग उपलब्ध करून पहाटे ०३:०० ते दुपारी १३:१५ या वेळेत मॅरेथॉन मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. एल जे रोड,शिकागो चौक ते माहीम चर्च जंक्शन बंद केल्याने सर्व बसेस सरस्वती विद्या मंदिर-सेनापती बापट मार्ग- धारावी टी जंक्शन- कलानगर वरून जातील व परतीच्या मार्गावर जाण्यासाठी बसेस शिकागो चौक-कलानगर-धारावी टी जंक्शन-सेनापती बापट मार्ग -सरस्वती विद्यामंदिर वरून जातील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.