मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोमाता एसआरएप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मुंबईच्या वांद्रे येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंबियांसहित किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड कंपनीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांची काही दिवसांपूर्वी एसआरए योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. तसेच पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आले होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
गेले वर्षभर आम्ही पाठपुरावा करत होतो, वरळीतील गोमाता एसआरएमधील गाळे ढापणे, स्वत:चे अनधिकृत कार्यालय उघडणे याविरोधात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल झाला अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community