वाशिममध्ये मुसलमानांच्या उरुसामध्ये फडकावले पाकिस्तानचे झेंडे 

171
 नुकतेच भिवंडीत मुसलमानांनी निदर्शने केली तेव्हा एका लहान मुलाने पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता वासिम येथे मुसलमानांच्या उरुसाच्या मिसवणुकीत चक्क पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आल्याची घटना घडली होती. याही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

पोलिसांकडून २ जणांना अटक 

मंगरुळपीर शहरात शनिवारी, १४ जानेवारी रोजी उरूसाच्या निमित्ताने रॅली काढण्यात आली होती. या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मिरवणुकीला २ डीजेंना परवानगी दिली होती. त्यात २१ डिजे बेधडकपणे वाजवत असल्याचे निदर्शनास आले. अनेक वर्षापासून मंगरुळपीर येथे उरूसानिमित्त रॅली काढण्यात येते. शनिवारी निघालेल्या या रॅलीत काही जण चक्क औरंगजेबाचा फोटो हातात घेत नाचताना दिसले. काहींनी पाकिस्तानचे झेंडे झळकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पोलिसांनी या प्रकाराची तपासणी करत २ जणांना अटक केली आहे.
कठोर कारवाईसाठी अध्यादेश काढावा – हिंदु जनजागृती समिती

मंगरूळपीर, वाशिम येथे बाबा हयात कलदंर दर्ग्यातील उरूसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे आणि क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र असलेले फलक हातात घेऊन नाचवण्यात आले. या घटनेचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते. काही धर्मांध जाणीवपूर्वक औरंगजेबाचे उदात्तीकरण करून राज्यातील शांतता भंग करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू पाहत आहेत. अशांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी शासनाने पूर्वलक्षी प्रभावाने एक अध्यादेश पारित करावा, तसेच पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली असली, तरी अशा प्रकारे औरंगजेबाचे उदात्तीकरण तथा पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यामागे काही षड्यंत्र आहे का, याचीही शासनाने सखोल चौकशी करावी. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्णसिंहासन फोडले, हिंदु मंदिरे फोडली, हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करून जनतेवर अत्याचार केले, छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, अशा हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे उदात्तीकरण हा महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. काही वर्षांपूर्वी अफलजखानवधाचे चित्र लावण्याने धार्मिक भावना दुखावतात, म्हणून त्या चित्रावर प्रतिबंध आणणारा आदेश तत्कालीन गृहमंत्र्यांनी काढला होता. तशाच प्रकारे औरंगजेबाचे उदात्तीकरण रोखण्यासाठी शासनाने कठोर असा शासन आदेश तात्काळ काढावा, अशी आमची मागणी आहे, असे हिंदू जनजागृती समितीने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.