जगातील सर्वात लांब नद्यांचा प्रवास करणाऱ्या गंगा विलास क्रूझचे लोकार्पण करण्यात आले. गंगा विलास क्रूझ सुरू झाल्यावर अवघ्या दोनच दिवसात हे क्रूझ नदीच्या मधोमध बंद झाल्याची माहिती मिळत आहे. गंगा विलास क्रूझला बिहारमधून पुढे जाण्यासाठी अडथळा येत आहे त्यामुळे घटनास्थळी एसडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांसाठी महत्त्वाची अपडेट! हार्बर लोकल सेवा ठप्प, प्रवाशांची गैरसोय )
बिहारच्या छापरा येथील डोरीगंज येथे नदीच्या पाण्याची पातळी अचानक कमी झाली. त्यामुळे क्रूझ पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला. क्रूझ किनाऱ्याला आणणे शक्य नव्हते. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क होऊन क्रूझच्या सर्व प्रवाशांना होडीतून किनाऱ्यावर आणले.
पाण्याची पातळी कमी झाल्याने अडथळा
छापरा भागातून डोरीगंज बाजारवर चिरांद सारण जिल्ह्याजवळ क्रूझला जायचे होचे. याठिकाणी पुरात्त्व मंदिर पाहण्यासाठी पर्यटक जाणार होते. परंतु त्याआधीच क्रूझला पाण्याची पातळी कमी झाल्याने अडथळा निर्माण झाला. या क्रूझचे कमीत कमी भाडे ५० हजार एवढे आहे. ही क्रूझ ५१ दिवासांची सफर करणार आहे. अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
https://twitter.com/ani_digital/status/1614952948836237312
Join Our WhatsApp Community