उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जे सरकार होते त्यांनी काय दिवे लावले? २ वर्षात किती उद्योग आणले? उद्योगाबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. कोरोना काळात मंदिरे सुरू झाली नाहीत पण दारूची दुकाने सुरू ठेवली. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले नाहीत, त्यामुळे संजय राऊतांचे आरोप म्हणजे नापासाची मार्कशीट असलेल्यांनी अभ्यासाचे तत्वज्ञान सांगण्यासारखे आहे, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हाणला.
६० मार्कांच्या भरवशावर मेरिट आणल्याचा वाव
दुकाने उघडी पण मंदिरे बंद. मविआ सरकारमधील चुका दुरुस्त करण्याचे काम भाजपा-शिंदे सरकार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने पूर्ण राज्यात आरोग्य व्यवस्थेत उत्तम काम केले असे म्हटले नाही. ६० मार्काच्या भरवशावर मेरिट आणल्याचा वाव मागील सरकार करत होते. मायावी गोष्टी लोकांपर्यंत पोहचवणे हे तंत्र मविआकडे चांगले आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच ज्यांच्याकडे आमदार, खासदारांचे बहुमत आहे त्यांना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे अधिकार आहेत. उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी ते इतर भावांचेही बाळासाहेब वडील होते. ते भाऊ एकनाथ शिंदेंसोबत आहेत. बाळासाहेब हे आमचे वडील आहेत असे उद्धव ठाकरे म्हणतात मग इतर भावांचेही ते म्हणणे आहे. ते भाऊ एकनाथ शिंदेंसोबत आहेत, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.