डाव्होसमध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक

112

स्वित्झर्लंड (Switzerland) येथील डाव्होसमध्ये (Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत (Organized International Conferences) पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, सोमवारी डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून, या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती  सामंत यांनी सांगितली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

( हेही वाचा: अजित पवारांची ‘ती’ इच्छा लवकरच पूर्ण होणार; केसरकरांचे विधान )

 सामंजस्य कराराबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

  • Greenko energy Projects Pvt.Ltd १२ हजार  कोटींची गुंतवणूक
  • Berkshire Hathaway Home Services Orenda India १६ हजार कोटींची गुंतवणूक
  •  ICP Investments/ Indus Capital १६ हजार कोटींची गुंतवणूक
  •  Rukhi foods २५० कोटींची गुंतवणूक
  • Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.