महाराष्ट्रावर जगभरातील गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री शिंदे

112
जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोसमध्ये दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी, १७ जानेवारी रोजी उद्योगांसमवेत विविध समंजस्य करार करण्यात आले.  मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधींनी गर्दी केली. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे समंजस्य करार झाल्यामुळे महाराष्ट्रावर उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

२ हजार रोजगार निर्मिती होणार

त्यापैकी पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी समंजस्य करार करण्यात आला असून नागरी विकासाला चालना मिळणार आहे. पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे २ हजार रोजगार निर्मिती होईल.

मुंबईत किती गुंतवणूक?

  • मुंबईमध्ये इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार असून, यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेंत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील.
  • बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी समंजस्य करार करण्यात आला आहे.
  • या समंजस्य करार प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॅा. हर्षदिप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा आदींची उपस्थिती होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.