अमेरिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून पैसा मिळताच लागलीच भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी वाटणाऱ्या पाकिस्तानच्या या धोरणामुळे पाकिस्तानचे जे व्ह्यायचे ते झाले. पाकिस्तान भिकारी झाला आहे. जनतेमध्ये एका भाकरीसाठी मारामाऱ्या होऊ लागल्या आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शेरीफ यांना हातात कटोरा घेऊन जगभर भीक मागत फिरण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. तरीही कुणी भीक द्यायला तयार नाही, हे लक्षात येताच पाकिस्तानला भारताची आशा वाटू लागली आहे. त्यासाठी पंतप्रधान शेरीफ यांनी त्यांची भाषा बदलली आहे. पंतप्रधान मोदींशी बोलण्यासाठी ते आतुर झाले आहेत. आता आम्हाला आमचा पैसा दारुगोळ्यावर वाया घालवायचा नाही, आम्हीच विकास करायचा आहे, अशी भाषा ते बोलू लागले आहेत.
कशी आहे पाकिस्तानची परिस्थिती?
पाकिस्तानातील जनता एक भाकरीसाठी हतबल आहे. भाकरीसाठी अनुदानित पिठाकरता चेंगराचेंगरीत झाली, अनेकांना जीव गमवावा लागला. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पूर्व पाकिस्तानातील सुरक्षा रक्षक ट्रकमध्ये AK-47 घेऊन लोकांना पीठ वाटप करण्यासाठी जातात, जेणेकरून ते पीठ सुरक्षित ठेवू शकतील. भाकरीचे पीठ वाचवण्यासाठी गोळीबार करावा लागत आहे. सध्या पाकिस्तानच्या कराचीमध्ये पिठाची किंमत 140-160 किलो आहे, तर इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये 10 किलोची पिठाची पिशवी 1500 किलोने विकली जात आहे. तर 20 किलो पिठाची पिशवी 2800 रुपयांना मिळते. खैबर पख्तुनख्वामध्येही पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. तिथे 20 किलोची पिठाची पोती 3100 ला विकली जात आहे. बिघडलेली परिस्थिती स्थिर ठेवण्यास सरकार असमर्थ आहे.
(हेही वाचा मविआत ‘वंचित’ची जबाबदारी शिवसेनेचीच; अजित पवार यांनी केले स्पष्ट)
काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान?
शेहबाज शरीफ (पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ) यांनी अल अरेबिया न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत आणि पाकिस्तान हे शेजारी आहेत. आम्ही भारतासोबत तीन युद्धे केली. आम्ही यातून धडा घेतला आहे. आता आम्हाला शांततेत जगायचे आहे. आमच्याकडे फक्त गरिबी आणि बेरोजगारी आहे. शांतता आणि प्रगतीसाठी आपले प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आम्हाला गरिबी संपवायची आहे. आमच्या लोकांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार द्यायचा आहे. आम्ही आमची संसाधने दारूगोळा आणि शस्त्रांवर वाया घालवू इच्छित नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा संदेश द्यायचा आहे की, आपण बसून बोलू. आपण दोन्ही देश अण्वस्त्रधारी देश आहोत. आता युद्ध झाले तर कोण टिकेल हे कोणालाच माहीत नाही. मला काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर प्रामाणिक, गंभीर आणि संवेदनशील चर्चा करायची आहे. आमच्याकडे अभियंते, डॉक्टर आणि कुशल कामगार आहेत. आम्हाला त्यांचा उपयोग देशात समृद्धी आणि शांतता आणण्यासाठी करायचा आहे जेणेकरून दोन्ही देशांचा विकास होईल. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण शांततेत आणि प्रगतीमध्ये राहतो की एकमेकांशी लढतो, असेही पंतप्रधान शेरीफ म्हणाले.
Join Our WhatsApp Community