बाळासाहेब थोरात काँग्रेसवर नाराज?

170

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात स्वपक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या निर्णयाविरोधात जाणाऱ्यांवर कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याची त्यांची भावना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तांबे कुटुंबाने काँग्रेसच्या निर्णयाविरोधात जात दंड थोपटले आहेत. त्यामुळे काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या सगळ्या घडामोडींवर थोरात मौन बाळगून असले तरी, ते पक्षाच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा आहे.

जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. मात्र, या आमदारांवर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासमत प्रस्तावावेळी अनेक काँग्रेस आमदार गैरहजर होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली होती. त्याही वेळी मवाळ भूमिका घेण्यात आली. असे असताना डॉ. सुधीर तांबे यांच्यावर मात्र तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे थोरात नाराज असल्याचे बोलले जात आहे.

थोरतांचे मौनव्रत कधी सुटणार?

सत्यजित तांबे यांच्याबाबत काहीतरी वेगळे घडत आहे. तुम्ही लक्ष द्या, असे मी बाळासाहेब थोरात यांना आधीच सांगितले होते, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. शिवाय भाजप नेते आणि महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही, सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला त्याला थोरात यांची समंती आहे का? असा सवाल केला आहे. त्यावर थोरात यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे थोरात यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

(हेही वाचा – BJP President: लोकसभा निवडणुकीपर्यंत जेपी नड्डांच्या हाती भाजपचे अध्यक्षपद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.