बॉलिवूडमध्ये MeToo मोहीम महिला अभिनेत्रींनी उघडली आणि सर्वच क्षेत्रातील महिला सतर्क झाल्या. मात्र आता हीच मोहीम भारतीय कुस्तीतील महिला कुस्तीपटूंनी सुरु केली आहे. या महिला कुस्तीपटूंनी थेट भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या महिला कुस्तीपटूंनी थेट जंतरमंतर मैदानात आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय तक्रार आहे खेळाडूंची?
या आंदोलनात ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि सरिता मोर यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे. आम्ही ऑलिम्पिकला गेलो तेव्हा आमच्याकडे फिजिओ किंवा प्रशिक्षक नव्हता. आम्ही आमचा आवाज उठवला आहे, पण आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. सर्व पैलवानांना त्रास होत आहे, असे फोगाटने सांगितले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे बजरंग पुनियाने सांगितले.
(हेही वाचा पुण्यात रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा, लाल महाल येथून होणार सुरुवात)
Join Our WhatsApp Community