हक्काचे घरे असावे असे स्वप्न बाळगून तुम्हीसुद्धा म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. म्हाडाकडून घर खरेदी करणा-यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. तुमच्यावर जास्त पैसे भरण्याची वेळ येऊ शकते.
म्हाडाचे घर घेताना भराव्या लागणा-या अनामत रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर तुम्हाला अनामत रक्कम जास्त भरावी लागू शकते. अनामत रकमेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि मंदीचे सावट आणि सध्याची एकूण स्थिती पाहता हा मोठा फटका म्हाडाचे घर घेणा-यांना बसू शकतो.
( हेही वाचा: धक्कादायक: अर्थमंत्रालयातील कर्मचारी इतर देशांना पुरवत होता गोपनीय माहिती; आरोपी अटकेत )
म्हाडाच्या कोकण मंडळानेसुद्धा पुण्याप्रमाणे अनामत रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. प्रस्ताव मंजूर झाला तर ठाणे, नवी मुंबई, वसई, विरारमधील घरांसाठी म्हाडाच्या घरासाठीची अनामत रक्कम दुप्पट भरावी लागू शकते.
रक्कम ‘अशा’ स्वरुपाने वाढण्याची शक्यता
- अत्यल्प गट- पूर्वी 5 हजार होती, आता ही रक्कम 10 हजार केली जाण्याची शक्यता
- अल्प गटासाठी ही मर्यादा 10 हजार होती आता ती 20 हजार होण्याची शक्यता आहे.
- मध्यम गटासाठी आता 30 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
- उच्च गटासाठी 40 हजार रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.