रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने रेल्वे रुळ ओलांडू नका अशी सूचना दिली जाती. तरी देखील अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडतात. नागपुरात कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे एका विद्यार्थीनीच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. बुधवारी, १८ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ विद्यार्थिनीचा रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेखाली चिडून मृत्यू झाला.
माहितीनुसार, मृत विद्यार्थिनीचे नाव आरती मदन गुरव असून ती अवघ्या १९ वर्षांची होती. भंडारा जिल्ह्यातील सातोना गावाची आरती होती. मात्र शिक्षणासाठी ती तिच्या मावशीच्या हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येते राहायची. डोंगरगाव येथील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात आरती बीई प्रथम वर्षात होती.
बुधवारी सकाळी आरती टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. मग रेल्वे फाटकाच्या मार्गाने ती पायीच रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. यावेळी आरती कानात हेडफोन लावून बोलण्यात तल्लीन होती. रेल्वे रुळ ओलांडताना तिला रेल्वेचा कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता. घटनास्थळी असलेल्या प्रवाशांना रेल्वे येताना दिसली, त्यामुळे त्यांनी जोरजोरात ओरडून आरतीला सांगण्याचा प्रयत्न केला. पण आरतीला काहीच ऐकू आले नाही. काही क्षणातच आरती भरधाव पुणे-नागपूर रेल्वेखाली (गाडी क्र. २१२९) चिरडून गेली. माहितीनुसार, या भरधाव रेल्वेने आरतीला ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि आरतीचा मृतदेह तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
(हेही वाचा – शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना ठेवले डांबून; शाळेविरोधात गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community