येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा हा उपक्रम राबविण्याविषयी अंबाजोगाई येथील हिंदू जनजागृती समितीतर्फे पोलिस निरीक्षक आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे हे कायदा विरोधी
या निवेदनात म्हटले की, राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता असून ते मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरा पेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. त्याची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तिची सुनावणी करताना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्र आणि राज्यातील गृह आणि शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रक काढले आहे. केंद्र शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने त्यानुसारही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे हे कायदा विरोधी आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्यातर्फे पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी यांनी तर अंबाजोगाई शिक्षण विभाग येथे गटशिक्षणाधिकारी शेख सी.आर. यांनी निवेदन स्वीकारले. यावेळो सुनिता पंचाक्षरी, योगिता केंद्रे, मेघा वटमवार, बालाजी भराजकर, संदीप किर्डे, सुधाकर जाधव आदी युवक उपस्थित होते.
(हेही वाचा मुंबईच्या विकासासाठीचा पैसा बँकेत पडून; पंतप्रधान मोदींचा घणाघात)
Join Our WhatsApp Community