वर्गात परीक्षेचा पेपर लिहिताना चिमुरडीला अचानक आला झटका; जागीच झाला मृत्यू

129

पंढरपूरमधील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गात परीक्षेचा पेपर लिहिताना ९ वर्षीय चिमुकलीचा अचानक झटका येऊन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे पाहून घाबरलेल्या शिक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. पण उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, ब्रेन हॅम्रेजमुळे झटका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अनन्याला येते होता सतत ताप

या ९ वर्षीय चिमुकलीचे नाव अनन्या अतुल भादुले असे होते. पंढपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये ती इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली. गुरुवारी तिचा मराठीचा पेपर होता आणि तो तिचा पूर्ण सोडवूनही झाला होता. पेपरची वेळ संपण्यास काही अवधी बाकी होता. पण त्यादरम्यान अनन्याचे हातपाय वाकडे होऊ लागले. तिची ही बिघडलेली अवस्था पाहून शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात हलविले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचार सुरू करण्यापूर्वीच दुर्दैवाने अनन्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून अनन्याची तब्येत ठीक नव्हती. तिला ताप येत होता.

(हेही वाचा – राज्यात अपघाताचे सत्र सुरुच! आता समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; १ ठार, २१ जखमी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.