एसटी बसेसवर श्रद्धेने लोक देवी देवतांचे वा विविध जाहिरातींचे स्टीकर्स लावतात. त्याने एसटी चालकाला रस्त्यावरील वाहने दिसण्यास अडथळा येतो आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो. म्हणून एसटी महामंडळाने परिपत्रक काढत एसटी बसेसच्या काचांवर देवी आणि देवतांचे फोटो किंवा स्टीकर्स लावण्यास प्रतिबंध केला आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला अशा प्रकारचे परिपत्रक लिहून एसटीच्या काचा स्वच्छ असाव्यात असे सांगण्यात आले आहे.
एसटीचा प्रवास इतर वाहनांच्या तुलनेने सुरक्षित
एसटी महामंडळाने एसटी बस आणि एसटी स्थानक परिसर मोहिम सुरु केली असून, हा त्याच योजनेचा हा एक भाग असल्याचे म्हटले जाते. एसटीला ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन म्हटले जाते. ग्रामीण भागातील या परीवहन सेवेचा अपघाताचा दर इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. दर एक लाख किलोमीटरला एसटी चालकाच्या अपघाताचे प्रमाण 0.17 टक्के इतके कमी आहे. समोरच्या वाहनाच्या चुकीचे प्रमाण 90 टक्के इतके आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास इतर खासगी वाहनांच्या तुलनेत खूपच सुरक्षित मानला जात असतो.
( हेही वाचा: पंतप्रधान मोदींनी प्रवास केलेली मेट्रो चालवली संभाजीनगरच्या ‘या’ मराठमोळ्या तरुणीने )
Join Our WhatsApp Community