एअर इंडियाच्या (Air India) विमानात महिलेवर लघुशंका केल्या प्रकरणी विमान कंपनीविरोधात शुक्रवारी, २० जानेवारीला मोठी कारवाई करण्यात आली आहे. डीजीसीएने (DGCA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. शिवाय संबंधित पायलटचे लायसन्स तीन महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. पायलटवर विमान नियम १९३७च्या नियम १४१ आणि डीजीसीएच्या नियमा अंतर्गत आपले काम करण्यात असफल राहिल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणातील पीडित महिलेने एअर इंडियावर वेळीच कारवाई न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. तसेच एअर इंडियाला डीजीसीएने चांगलेच खडसावले होते. डीजीसीए म्हणाले होते की, ‘याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का करू नये. तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडली नाही, पण तरीही न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करता तुम्हाला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देऊन पुढील कारवाई केली जाईल.’
त्यानंतर आता डीजीसीएकडून विमानाच्या पायलटने आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार न पाडल्याने पायलटचे लायसेन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच एअर विमानच्या डायरेक्टरला तीन लाख रुपायांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय एअर इंडियाने शंकर मिश्राला चार महिन्यांची बंदी घातली आहे.
नेमके प्रकरण काय?
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशी महिलेवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरु केला. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली होती.
(हेही वाचा – Income Tax Raids: सोलापुरात व्यावसायिकांच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी)
Join Our WhatsApp Community