ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलची मोठी फसवणूक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सामान्य माणसे या ऑनलाईन फ्राॅडचा शिकार होत असतात. परंतु, आता आयसीसीदेखील शिकार झाली आहे. एका व्यक्तीने आयसीसीला कोट्यावधींचा चुना लावला आहे. दरम्यान, या फसवणुकीची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एका ऑनलाईन फ्राॅडची बळी ठरली आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील एका व्यक्तीने ICC साठी सल्लागार म्हणून बोगस ईमेस आयडी तयार केला असल्याची माहिती आहे. यावेळी त्याने फेडरेशनच्या सीएफओकडे व्हाऊचरची मागणी केली. या माध्यमातून त्याने आयसीसीची 21 कोटींची फसवणूक केली आहे.
( हेही वाचा: MSRTC: एसटीच्या काचांवर स्टीकर्स नको, महामंडळाने काढले पत्रक )
बिले भरण्याचा मेल आणि कोट्यावधी गायब
बोगस ईमेल आयडीच्या माध्यमातून अमेरिकेतील एका व्यक्तीने 20 कोटींपेक्षा अधिकची बिले ICC चे मुख्य वित्त अधिकारी म्हणजेच CFO यांना पाठवली तसेच या बिलांचे पैसे भरण्यास सांगितले. CFO कार्यालयाने ही बिले भरली आणि त्यांची फसवणूक झाली.
Join Our WhatsApp Community