बेस्टमधून १५० रुपयांत करा लक्झरी प्रवास! हे आहेत प्रिमियम बससेवेचे नवे मार्ग

172

बेस्ट उपक्रम लवकरच नव्या मार्गावर प्रिमियम बससेवा सुरू करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यानुसार आता मुंबई विमानतळ ते कफ परेड या नव्या मार्गावर गुरूवारपासून मोबाइल अ‍ॅपआधारित बेस्टची प्रिमियम सेवा सुरू झालेली आहे. डिसेंबरमध्ये बेस्ट उपक्रमाने ठाणे ते बीकेसी अशी लक्झरी बससेवा सुरु केली. या सेवेला सध्या प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

( हेही वाचा : बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्कारावर अहिराणी ‘यासनी मायनी यासले’ची मोहोर )

बेस्टने १२ डिसेंबरपासून ठाणे-वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानकादरम्यान प्रिमियम सेवा सुरू केली. मुंबई विमानतळ ते दक्षिण मुंबई मार्गावरही प्रिमियम सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आल्यामुळे मुंबई विमानतळ ते कफ परेड या नव्या मार्गावर प्रिमियम बस चालवण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.

सकाळी ७ पासून दर १ तासाने ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या बसमधून मुंबई विमानतळ ते कफ परेडदरम्यानच्या प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबई विमानतळ ते बीकेसी पर्यंतच्या प्रवासासाठी १५० रुपये तिकीट असणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी), वरळी सी फेस, मरिन ड्राईव्हमार्गे ही बस धावणार आहे.

मुंबई विमानतळ ते कफ परेड

  • मुंबई विमानतळ ते वांद्रे कुर्ला संकुल – १५० रुपये
  • मुंबई विमानतळ ते वरळी सी फेस – १९० रुपये
  • मुंबई विमानतळ ते मरिन ड्राईव्ह – २३५ रुपये
  • मुंबई विमानतळ ते कफ परेड – २५० रुपये
  • वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते मरिन ड्राईव्ह – १७० रुपये
  • वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते कप परेड – २१० रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.