स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील कारागृहातून १८९ कैद्यांना मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. ही मुक्तता २६ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार असून त्यात विकलांग कैदी, ५० टक्केपेक्षा अधिक शिक्षा भोगलेल्या आणि कारागृहात चांगली वर्तवणूक असलेल्या कैद्यांचा यात समावेश असणार आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे)
भारतात देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिना निमित्त “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे, यानिमित्त समारोहाचा भाग म्हणून विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या मात्र चांगल्या वर्तवणुकीच्या व189 sentenced prisoners निकषानुसार कैद्यांना पात्र ठरवून त्यांना विशेष माफी देऊन त्यांची कारागृहातून सुटका करण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून काही निकष काढण्यात आले आहेत. या निकषावरून महाराष्ट्र राज्यातील कारागृहातून १८९ कैद्यांची येत्या २६ जानेवारी रोजी मुक्तता करण्यात येणार आहे. कैद्यांमध्ये कारागृहातील शिस्त आणि चांगले वर्तन सुनिश्चित करणे आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून कारागृहातील लवकर सुटकेची संधी उपलब्ध करून देणे हा माफी योजनेचा उद्देश आहे. यामुळे त्यांना गुन्हेगारीचे जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासही प्रोत्साहन मिळेल.
या कैद्यांची होणार सुटका…
१)५० वय असलेल्या महिला गुन्हेगार ज्यांना शिक्षा होऊन त्यांनी ५०टक्के शिक्षा भोगली आहे.
२) ५०वय असलेले तृतीयपंथी ज्यांनी ५० टक्के शिक्षा भोगली आहे.
३)६० वय असलेले दोषी पुरुष ज्यांनी ५०टक्के शिक्षा भोगली आहे.
४) ७०टक्के पेक्षा अधिक शारीरिक दृष्ट्या विकलांग असणारी व्यक्ती ज्यांनी ५०टक्के शिक्षा भोगली आहे.
५) गंभीर आजारी असणारे कैदी.
६) आर्थिकदृष्ट्या गरीब कैदी ज्यांनी शिक्षा पूर्ण केली मात्र दंडाची रक्कम भरू शकलेले नाही असे कैदी.
७) तरुण कैदी ज्यांनी वयाच्या १८ ते २१ वर्षी गुन्हा केला आहे, त्यानंतर त्याच्यावर कुठलाही गुन्हा नाही तसेच ५०टक्के शिक्षा पूर्ण केली आहे असे कैदी.