सायन येथील अॅण्टोप हिल परिसरात राहणा-या 9 महिन्यांच्या बालकाचा गुरुवारी, २० जानेवारी रोजी पालिका रुग्णालयात मृत्यू झाला. बालकाचा मृत्यू संशयित गोवरचा मृत्यू असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. समितीच्या अहवालानंतरच बालकाचा मृत्यू गोवरमुळे झाला होता का, याबाबत स्पष्टता येईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
काय आहे प्रकरण?
11 जानेवारी रोजी रुग्णाला ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ लागला होता. दोन दिवसानंतर बाळच्या शरीरावर पुरळ आले. बाळाची श्वसनक्रियाही वाढली. बाळाच्या पालकांनी तीन दिवसानंतर त्याला पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पालिका रुग्णालयात बाळाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. बाळाची श्वसनक्रिया निकामी झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. बाळाची प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी, 19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी बाळाचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी मुंबईत लहान बालकांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्यानंतर आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 8 मृत्यू गोवरमुळे झाल्याचे निश्चित असून, 7 मृत्यूंबाबत अद्यापही मृत्यू निश्चित अहवाल समितीकडून माहिती येणे प्रलंबित आहे.
(हेही वाचा Union Budget 2023: रेल्वे स्थानकांवर आता विमानतळासारखी सुविधा, ‘असा’ होणार कायापालट)
Join Our WhatsApp Community