भारत आणि मोदींबद्दल बरळणा-या हिना रब्बानीला श्री श्री रविशंकर यांचे चोख प्रत्युत्तर

129

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे. पाकिस्तानच्या राज्यमंत्री हिना रब्बानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबदद्ल बरळल्या आहेत. पण त्याच स्टेजवर असणारे आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी हिना रब्बानीला प्रत्युत्तर दिले आहे. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमच्या बैठकीत साऊथ एशियावर आयोजित एका सत्रात हिना रब्बानी आणि आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर सहभागी होते. यावेळी हिना रब्बानी यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल गरळ ओकण्यास सुरुवात केली होती.

रब्बानी बरळल्या

दोन्ही देशांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचे आधीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांना पाकिस्तान मित्र म्हणून पाहत होते. पण आता भारत आणि नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान मित्र म्हणून पाहत नाहीत, असे हिना रब्बानी म्हणाल्या. परराष्ट्रमंत्री म्हणून जेव्हा मी भारतामध्ये गेले होते, तेव्हा चांगल्या सहकार्यासाठी खूप मेहनत घेतली होती. सध्या असणा-या स्थितीपेक्षा तेव्हा आम्ही चांगल्या स्थितीत होतो, असेही रब्बानी म्हणाल्या.

( हेही वाचा: बृजभूषण शरण सिंह यांना दणका; भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय )

पाकिस्तानला आत्मचिंतनाची गरज 

या वक्तव्याला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. समस्या त्यांच्या बाजूने आहेत, हे पाकिस्तानला समजले पाहिजे. कारण भारताला इतर कोणत्याही शेजारी देशासोबत अडचणी नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वत: विचार करावा, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.