शरद पवार नेहमी फोन करतात; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

177

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठावर असताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला सन्मानपूर्वक बोलणे भाग असते, अशीच पंचाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली. शनिवार, २१ जानेवारी रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार हे एकत्र आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

शरद पवार यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे हे काम नजर अंदाज करता येण्यासारखे नाही. शरद पवार हे आपल्याला वेळोवेळी फोन करत असतात, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार , विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आदी उपस्थित होते. राज्याच्या विकासात आपल्या सर्वांचे सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. पवार साहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत. त्यांनी गेली अनेक वर्षे या राज्यात आणि देशांमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचे योगदान देखील फार मोठं आहे. त्यामुळे ते कुठला माणूस सत्तेवर बसला आहे हे न पाहता राज्याच्या हितासाठी नेहमी मार्गदर्शन करत असतात. मला देखील जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा ते फोन करतात, सूचना देत मार्गदर्शनही करतात, असे शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा आता संजय राऊतांचे निकटवर्ती सुजित पाटकरांचा स्टॅम्प पेपर घोटाळा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.